Video : मी एवढ्या लांब असताना माझा मित्र मला कायमचा सोडून गेला, मोदी झाले भावूक

1248

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बाहरेन येथे असून शनिवारी तेथील हिंदुस्थानी जनतेला संबोधताना जेटली यांच्या आठवणीने भावूक झाले होते.

अरुण जेटली व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणपणीपासून राजकारणात एकत्र असून ते एकमेकांचे चांगले मित्र होते.  मात्र जेटली यांच्या निधनाच्यावेळी मोदी हे सध्या बाहरेन येथे आहेत. मित्राच्य़ा अखेरच्या क्षणी आपण एवढ्या लांब असल्याचे दुख त्यांनी बाहरेनमध्ये भाषण करताना व्यक्त केलं. ‘मी विचारच करू शकत नाहीए की माझा मित्र मला कायमचा सोडून गेला आणि मी एवढ्या लांब इथे दुसऱ्या देशात बसलोय. मोठं दुख घेऊन आज मी तुमच्यासमोर आलोय. काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या आपल्याला सोडून गेल्या आणि आज माझा मित्र अरुण मला सोडून गेला. खूप कठिण प्रसंग आहे हा माझ्यासाठी. एका बाजूला कर्तव्य आहे तर मनात आठवणींचे काहूर माजलेय.’, अशा शब्दात मोदींनी दुख व्यक्त केलं.

आपली प्रतिक्रिया द्या