
महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठत पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर एमआयटी कॉलेजच्या मैदानात झालेल्या सभेत 140 इलेक्ट्रिक बसेस, ई-बस डेपो, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे लोकार्पण, तर नदी पुनरुज्जीवन, नदीसुधार योजनेचे भूमिपूजन केले. रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी असल्याने पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार गिरीश बापट, खासदार उदयनराजे भोसले, प्रकाश जावडेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
पुणेकरांसाठी आणखी 150 इलेक्ट्रिक बसेस
पुणेकरांच्या सेवेसाठी आणखी 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. मेधा इंजिनीअरिंगची उपपंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनमार्फत मुंबई, सुरत, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि इलेक्ट्रिक वाहन सेवा पुरवण्यात येत असून नव्या बसताफ्यामुळे पुण्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.































































