
देशात ‘अनलॉक-1’ सुरू झाल्यापासून लोकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. हा बेजबाबदारपणा चिंता वाढवणारा आहे. आता ‘अनलॉक-2’ मध्ये प्रवेश करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.
देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कोरोनापासून बचावासाठी अटी-शर्तीचे पालन न करणाऱया नागरिकांना सुनावले. कोरोना लॉकडाऊनमध्ये मास्क वापरणारे, दिवसभरात अनेकदा 20 सेकंद हात धुणारे काही लोक आता ‘अनलॉक-1’ सुरू होताच बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. हा निष्काळजीपणा योग्य नाही. सर्वांनी काळजीने वागले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान काय म्हणाले?
z आता पावसाळा सुरू झाला आहे. अशा ऋतूमध्ये सर्दी, ताप, खोकला सहज पसरतो. त्यामुळे लोकांनी सतर्क रहावे, अशी हात जोडून विनंती केली.
z निष्काळजीपणा करू नये. कंटेनमेंट क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवावे लागेल. जे लोक लॉकडाऊनमध्ये पालन करणार नाहीत त्यांना थांबवावे लागेल.
z ‘एक देश एक रेशनकार्ड’ या योजनेचा लाभ स्थलांतरी कामगारांना होत आहे.
z देशातील 130 कोटी जनतेने एकत्र येऊन काम केले तर आपण स्वावलंबी हिंदुस्थान बनवू. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे दिवसरात्र काम केले पाहिजे.





























































