मोदींनी दिल्लीत टोचून घेतली कोरोनाची लस ;जुळला निवडणुका लागलेल्या राज्यांचा योग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-vaccine

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या स्वदेशी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी ‘लस टोचलीसुद्धा, कळलेही नाही’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून बाहेर आली. केरळ व पुद्दुचेरीच्या नर्सेसनी त्यांना लस टोचली, तर यावेळी त्यांच्या गळय़ात आसामचा गमछा होता. विधानसभा निवडणुका लागलेल्या तिन्ही राज्यांचा लसीकरण केंद्रावर जुळून आलेला हा योग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या गाडय़ांच्या ताफ्याचा सामान्य जनतेला त्रास नको म्हणून मोदी सोमवारी सकाळीच गळय़ात आसामचा गमछा घालून एम्स रुग्णालयात पोहोचले होते. येथे पुद्दुचेरीच्या नर्स पी. निवेदा यांनी त्यांना लस टोचली. यावेळी केरळची नर्स रोसम्मा अनिल शेजारी उभी होती. लसीकरण केंद्रावर ‘आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ’ या तिन्ही राज्यांचा त्रिवेणी योग जुळून आला. या राज्यांमध्ये 27 मार्च ते 6 एप्रिल यादरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधानांच्या हजेरीबाबत एम्स रुग्णालयातील कर्मचाऱयांना पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे पंतप्रधानांची हजेरी एम्सच्या कर्मचाऱयांसाठी मोठे सरप्राईज ठरले. पंतप्रधानांनी नर्सेसशी त्यांच्या भाषेत संवाद साधत त्यांच्याबाबत विचारपूस केली.

निकषात बसणाऱया सर्व  लोकांनी लस घ्यावी -मोदी 
मोदींनी ‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन नर्सेससोबतचा आपला पह्टो सोशल मीडियात शेअर केला. कोरोनाविरोधातील वैश्विक लढय़ात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी दिलेले योगदान असाधारण आहे. निकषात बसणाऱया सर्वांनीच लस घ्यावी. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनमुक्त बनवायचे आहे, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला.