पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची आरबीआयसमोर निदर्शने

276
Mumbai: Depositors of the Punjab and Maharashtra Co-operative Bank (PMC) display placards during a protest over the Reserve Bank of India (RBI)'s curb on the bank, outside RBI headquarters, in Mumbai, Saturday, Oct. 19, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI10_19_2019_000039B)

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ठेवीदारांनी शनिवारी फोर्ट येथील रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आरबीआयने आपली जबाबदारी योग्यरितीने पार न पाडल्यानेच ठेवीदार, ग्राहकांची आर्थिक कोंडी झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

पीएमसी बँकेने नियम धाब्यावर बसवून एचडीआएल कंपनीला दिलेल्या सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कर्जामुळे आरबीआयने बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे खात्यावर लाखो रुपये असतानाही ग्राहकांना केवळ 40 हजार रुपयेच काढता येत असल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमसी बँक व्यवस्थापन आणि आरबीआयच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी सकाळी पावणेबाराच्या सुमारास ठेवीदारांनी मुख्यालयासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळपासूनच आरबीआयसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या