पुण्यात पाणीच पाणी, जलवाहिनी फुटल्याने पूरसदृश परिस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील येरवडा गुंजन टॉकीज चौकात पालिकेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनी फुटल्याने अक्षरश: पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहून जात आहे. राज्यात भीषण पाणीटंचाई असताना मोठ्याप्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.