साठय़े महाविद्यालयात ‘वाट पंढरीची’! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले पूर्व येथील साठये महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अक्षरशः विठुरायाची पंढरी उभी केली. बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यम विभागातर्फे ‘वाट पंढरीची’ या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, डोईवर तुळस घेतलेल्या विद्यार्थीनी, टाळ – मृदंगाचा गजर आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष असे भक्तीमय वातावरण
कॉलेजमध्ये रंगले.   

आषाढी एकादशीच्या दुसऱया दिवशी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये वारीसोबत भक्तिगीते, नृत्य, भारुड सादर झाले. विद्यार्थ्यानी पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरापासून ते चंद्रभागा नदीपर्यंतचा संपूर्ण इतिहास सांगत तिचे कशाप्रकारे संवर्धन केले पाहिजे त्याचबरोबर या सर्व संस्कृती, पिढय़ानपिढय़ा चालत आलेली परंपरा यांचे महत्त्व पटवून दिले. 

परीक्षा, प्रोजेक्ट हे सर्व सांभाळून विद्यार्थ्यांनी कमी वेळेत कार्यक्रम जमवून आणला. साठय़े महाविद्यालयातील प्राध्यापक गजेंद्र देवडा सरांनी   ‘वाट पंढरीची’ कार्यक्रमाची कामगिरी चोख बजावली.  त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अथर्व शिर्पे व चतुर्थी गुरव यांनी साकारलेली विठ्ठल रखुमाईची भूमिका पाहून अक्षरशः डोळ्याचे  पारणे फिटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक साठय़े  महाविद्यालयातील बीएमएमचा विद्यार्थी वैभव ताम्हणकर याने केली. शिक्षकांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेला हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरलाa. संस्कृती, परंपरा जपल्या पाहिजेत. नव्या पिढींनी त्यात उत्साहाने सहभागी व्हायला पाहिजे. प्रत्येक शाळा– महाविद्यालयांत असे उपक्रम राबवले गेले पाहिजे. 

मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज