पीएनबी, युनियन आणि सिंडीकेट बँक आरबीआयच्या निशाण्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने (आरबीआय) आणखी सहा बँकांची खालावलेली स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा समावेश प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शनमध्ये (पीसीए) करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पीएनबी बॅकेसह युनियन बॅक ऑफ इंडिया, सिंडीकेट बॅक असून डबघाईला आलेल्या या बॅकांची कर्जे सुस्थितीत चालणाऱ्या बॅकेला विकण्याची योजना वित्त मंत्रालयाने आखली आहे.

पुढील महिनाभरात या बँकाचा समावेश पीसीएमध्ये झाला तर अशा बँकांची संख्या १७ वर पोहोचणार आहे. यापूर्वी इलाहाबाद बँकेचा समावेश पीसीएमध्ये करण्यात आला होता. या बँकांना कर्जाचा दर नसलेली मोठय़ा रकमेची कर्जे ग्राहकांना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. देना बँकेलाही नवी कर्जे न देण्याच्या सूचना आरबीआयने केल्या आहेत.

– देशातील सहा बॅकाची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आरबीआय या बॅंका कधीही बंद करू शकते.

– या बॅकांची केंद्र सरकार आणि आरबीआयसोबत बैठक झाली असून पुढील दोन ते तीन महिन्यात स्थिती सुधारण्याचे आश्वासन या बँकांनी दिले आहे. मात्र आरबीआयने पीसीएमध्ये या बँकांचा समावेश केल्यास त्यांची स्थिती अधिकच खालावणार आहे.

– पीसीएमध्ये समावेश झाल्यास नवीन शाखा उघडण्यावर बंदी येणार आहे. तसेच बँकांचे डिव्हीडंट पेमेंटही बंद होणार आहे.

– गरज भासल्यास आरबीआय या बँकांचे ऑडीट आणि पुर्नबांधणीचे आदेशही जारी करण्याची शक्यता आहे.

या बँकांचा पीसीएमध्ये समावेश

इलाहाबाद बॅक, युनायटेड बॅक ऑफ इंडिया, कॉरर्पोरेशन बॅक, आयडीबीआय, युको, बॅक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बॅक, ओरिएंटल बॅक ऑफ कॉमर्स, देना बॅक, बॅक ऑफ महाराष्ट्र.