
नववीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 4 शाळकरी मुलांचाही समावेश आहे. 15 वर्षांची ही मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. आतापर्यंत आपल्यावर 10 जणांनी अत्याचार केल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले आहे. उरलेल्या आरोपींचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. 2016 पासून या मुलीवर अत्याचारांना सुरुवात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ग्रुपवर चुकीचा मेसेज टाकणाऱ्या व्यक्तीसह 10 ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल
या मुलीचे आईवडील हे कोईंबतूर भागातील बांधकाम मजूर आहेत. चार वर्षांपूर्वी या मुलीचे एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. या विद्यार्थ्याने तिच्यावर सगळ्यात पहिल्यांदा बलात्कार केला होता. त्याने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचं या पीडितेने सांगितले आहे. यानंतर या मुलीशी आणखी तीन विद्यार्थ्यांनी मैत्री वाढवली. या मैत्रीचा फायदा उचलत या तिघांनीही तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ही मुलगी ज्या ठिकाणी राहाते त्या परिसरातील सहा युवकांनीही तिचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आणि बलात्कार केले.
दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली, पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल
गेल्या शुक्रवारी या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना सांगितले. आईवडिलांना सहन कराव्या लागणाऱ्या सातना न पाहावलल्याने ही मुलगी शनिवारी रुग्णालयातून पळून गेली होती. तिच्या आईवडिलांनी पोलिसांत याबाबतची तक्रार केली ज्यानंतर पोलिसांनी अत्यंत वेगाने तिचा शोध घेत त्याच रात्री शोधून काढले. या मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी 10 पैकी 7 आरोपींना अटक केली आहे.

























































