
सामना ऑनलाईन, जालना
अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल परजने (वय-50 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. परजने जिथे रहात होते, त्या खोलीमध्येच त्यांनी सर्व्हीस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवन संपवले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये.

































































