मास्क न घालणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्यामुळे सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. कोविडचा फैलाव होऊ नये यासाठी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलीस आक्रमक झाले आहेत.

कोरोना झपाटय़ाने पसरू नये याची शासन दरबारी खबरदारी घेण्यात आली आहे. मास्क घाला, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन सर्व पातळीवर करण्यात येत आहे, मात्र तरीदेखील काही बेजबाबदार नागरिक मास्क न लावता खुलेआम फिरत आहेत. अशा लोकांविरोधात पोलिसांनी आता ठिकठिकाणी फिल्डिंग लावली आहे. जो विनामास्क फिरताना सापडेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क घाला, गर्दी टाळा असे वारंवार आवाहन पोलिसांकडून केले जात आहे, मात्र तरी मास्क न घालणाऱ्यांना पोलीस दंड ठोठावत आहेत.