
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची व दुसऱ्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग, खरेदीसाठी बाजरपेठेत होणारी गर्दी, मास्क वापरणे, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी संगमेश्वर पोलिसांतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
मास्क वापराल तर सुरक्षित रहाल’, आपल्या सोबतची व्यक्ती जरी ओळखीची असली तरी त्यांच्यापासून संक्रमणाचा धोका असू शकतो. प्रवास करताना काळजी घ्या व शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा. घराबाहेर जाताना नेहमी मास्क वापरा व सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. अशा प्रकारचे फलक घेऊन जनजागृती करत आहेत. या जनजागृतीसाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण देशमुख, तसेच पोलीस सागर मुरुडकर व इतर पोलीस सहकारी यांनी संगमेश्वर बाजारपेठेत कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत आहेत.



























































