
सिक्कीमच्या लिंग्ज्या परिसरात पोलिसांची गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू झाला असून चारजण जखमी आहेत. संगकलंग चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस एका आरोपीला आणण्यासाठी लिंग्ज्या येथे जात होते त्यावेळी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात घडला. सांचा बीर तमांग, लेनसोंग लेप्चा आणि युगेन लेप्चा अशी मृत पावलेल्या पोलिसांची नावे आहेत, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































