पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरुन चाकूने भोसकले

1266
murder-knife

माझ्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून दोघांनी संगनमताने चाकूने एकास भोसकल्याची घटना लातूर शहरातील कन्हेरी चौक येथे घडली.

यासंदर्भात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात प्रताप उर्फ प्रमोद विश्वासराव नाईक (रा. माताजी नगर लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, 23 मे रोजी गोकुळ मंत्री याने फिर्यादीचे पैसे काढून घेऊन वस्तऱ्याने मारहाण करून जखमी केले होते. त्यासंदर्भात फिर्यादीने त्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 23 रोजी दिलेली होती. 24 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र गजानन लामदाडे हे दोघे कन्हेरी चौकातील नंदनी पान स्टॉल समोर बोलत थांबले होते. तेव्हा गोकुळ बंडूलाल मंत्री व त्याच्यासोबत एकजण त्यांच्याजवळ आले.

गोकुळ मंत्री याने, तु माझ्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास का गेला म्हणून शिवीगाळ केली व चाकूने फिर्यादीच्या पोटात दोन वार केले. तर गोकुळ मंत्री याच्यासोबत आलेल्या इसमाने चाकूने फिर्यादीच्या पाठीमागुन दोन वार केले आणि दोघेही पळून गेले. फिर्यादीचा मित्र ही घटना पाहुन घाबरुन पळून गेला. फिर्यादीचा भाऊ अविनाश याने रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शुध्दीवर आल्यानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरुन गोकुळ मंत्री व त्याच्या साथीदाराविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या