संगमनेरमध्ये काँग्रेस नगरसेवकाकडून ३ कोटींच्या जून्या नोटा जप्त

सामना प्रतिनिधी । संगमनेर

संगमनेरमध्ये चलनातून बाद झालेल्या २ कोटी ९९ लाख रुपये किंमतीच्या १००० व ५०० रुपयांच्या नोटांसह काँग्रेस नगरसेवकाला आणि त्याच्या चार साथीदीरांना खडक पोलिसांनी रविवार पेठेतून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेस नगरसेवक गजेंद्र अभंग,विजय शिंदे, आदित्य चव्हाण,सुरेश जगताप अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठ येथे चलनातून बाद झालेल्या नोटांची मोठी रोकड बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती खडक पोलिसांच्या पथकाला गुरुवारी रात्री उशीरा मिळाली होती. त्यानुसार खडक पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रात्री उशीरा कॉंग्रेस नगरसेवक गजेंद्र अभंग आणि त्यांचे इतर साथीदार ट्रॅव्हलबँगा घेऊन तेथे आले. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यावर बॅगांमध्ये सुमारे २ कोटी ९९ लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी सदर नोटा जप्त केल्या आहेत. तसेच पाचही जणांना ताब्यात घेऊन आयकर विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे.