पोलिसांनी वर्षभरात 87 मुलांची मजुरीच्या दलदलीतून सुटका

गेल्या वर्षभरात मुंबई  गुन्हे शाखेच्या विशेष बाल सहाय्य कक्षाने (जापू) विभागाने 87 बालकांची मजुरीच्या दलदलीतून सुटका केली.  यामध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक आहे.

गोवंडीच्या शिवाजी नगर येथील रफीक नगर परिसरात असलेल्या टोपी बनवण्याच्या कारखान्यात बालकामगार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार जेथे छापा टाकून दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी कारखान्याचा मालक मोहम्मद बुद्रू जामा शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुटका करण्यात आलेला 16 वर्षांचा मुलगा बिहार, तर 14 वर्षांचा मुलगा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमधील सर्वाधिक बालकामगार

2024 मध्ये मुंबईतील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांमध्ये बालकामगारप्रकरणी 28 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईत 61 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली होती. तर 2025च्या एप्रिलपर्यंत 12 गुन्हे नोंदवण्यात आले असून, 26 मुलांना मजुरीच्या दलदलीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यात उत्तर प्रदेश व बिहारमधील मुलांची संख्या अधिक आहे.