…आणि त्या शेतकऱ्याचं शेत बनलं सेल्फी पॉईंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। हुबळी

सेल्फी काढायला आवडत नाही असा एकही जण शोधून सापडणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सेल्फीचं वेड लागलंय. त्यातही कोणाला कुठे व कधी व कोणाबरोबर सेल्फी काढावासा वाटेल हे देखील सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील मुंदरगी आणि गडग या गावांदरम्यान झाला आहे. शेतं वाचवण्यासाठीची जाळी परवडत नसल्याने आणि डाळींबाचं पिकं उन्हात करपू नये म्हणून एका शेतकऱ्याने झाडं साड्यांनी झाकली. मात्र यामुळे संपूर्ण शेतच रंगीबेरंगी व सुंदर दिसू लागलं. हे बघून लोकांनी शेतालाच सेल्फी पॉईंट बनवून टाकलं आहे.

या शेतात आता स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे. व्यंकटेश बी या शेतकऱ्याचे हे शेत असून त्याने 10 एकर जमिनीवर डाळींबाचं पिक घेतलं आहे. 10 वर्षासाठी त्याने भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली आहे. पण आतापर्यंत कोणीही हे शेत बघायले आले नव्हते. मात्र साड्यांमुळे सगळेच जण शेतात येऊ लागल्याने व्यंकटेश भलतेच खूश आहेत.