
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बात्राने तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध अभिनेता नवाब शहासोबत गुपचूप लग्न केले आहे. सध्या ते दोघेही हनीमूनसाठी गेले असून तेथील एक फोटो पूजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत पूजाने लग्नात घालतात तसा चूडा घातला आहे. पूजाचे हे दुसरे लग्न आहे.
पूजा व नवाब यांनी नुकतेच पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. ईदच्या दिवशी नवाबने इंस्टाग्रामवरून पूजासोबतचे त्याचे नाते जाहीर केले होते. ते दोघे एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
विरासत, भाई अशा चित्रपटात काम केलेल्या पूजाचे 2003 साली लॉस एजेलिसमधील डॉक्टर सोनू अहलुवालिया याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला व पूजा पुन्हा हिंदुस्थानात परतली.




























































