
जगप्रसिद्ध पॉप सिंगर शकीरा व स्पेनचा स्टार फुटबॉलपटू गेरार्ड पिक यांचे ब्रेकअप झाले आहे. गेरार्ड व शकीरा हे 12 वर्षापासून एकत्र होते त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत.
शकिरा व गेरार्ड यांची भेट 12 वर्षापूर्वी एका फुटबॉल सामन्यात झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही गेली 12 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यातून त्यांना दोन मुलंही झाली आहेत. काही दिवसांपासून शकिराने गेरार्डसोबतचे फोटो शेअर करणं बंद केलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होत होती. त्या दरम्यान मदर्स डेला शकिराने मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहलेली पोस्ट ही त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचे संकेत दिले.
गेरार्डचे दुसऱ्या कुणासोबत तरी संबंध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे शकिराने त्याच्यासोबत ब्रेकअप केल्याचे समजते. शकिराने आज अधिकृतपणे ते वेगळे झाल्याचे घोषीत केल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.




























































