
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला आज मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्मप्रकरणात अटक केली. क्राईम ब्रँचने आज त्याची 7-8 तास चौकशी केली. चौकशीदरम्यान पॉर्न फिल्मप्रकरणी सबळ पुरावे असल्याने रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली.
चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलला मिळाली होती. त्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात प्रॉपर्टी सेलने मढ येथे छापा टाकून पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या चौकशीदरम्यान एका मॉडेलचे नाव समोर आले होते. पोलिसांनी त्या मॉडेललादेखील अटक केली होती. त्या मॉडेलने काही तेलगू आणि हिंदी चित्रपटातदेखील काम केले होते. त्या मॉडेलने आतापर्यंत 87 पॉर्न व्हिडिओ अपलोड केले होते. तिच्या चौकशीत दरम्यान राज कुंद्राचे नाव समोर आले होते.



























































