Porn racket – तरुणींना जबरदस्ती ठेवायला लावायचे शरीरसंबंध, गेहना वशिष्ठ करायची रेकॉर्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेट प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला पाठिंबा देणारी अभिनेत्री गेहना वशिष्ठ हिच्यावर आता गंभीर आरोप झाला आहे. गेहना ही या रॅकेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींना जबरदस्ती पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवायला लावायची व त्यावेळी तिच त्याचे व्हिडीओ देखील रेकॉर्ड करायची. मालाड मढ आयलँडमधील एका बंगल्यात गेहनाचे हे भयंकर प्रकार चालायचे.

porn

या प्रकरणातील दोन पीडितांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ही धक्कादायक माहिती दिली आहे. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. यात एका पीडितेने रोवा खान नावाच्या महिलेवर दुसऱ्या एका पीडितेने गेहना वशिष्ठवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मी 2016 पासून मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे. याच दरम्यान माझी ओळक एका अजित नावाच्या मुलाशी झाली. त्याने माझी कास्टिंग डायरेक्टर नरेश आणि मितुलसोबत 10 जानेवारी 2021 ला करून दिली. त्यावेळी नरेशने मला एका वेबसिरीजची ऑफर दिली. त्यासाठी मला दहा हजार रुपयांचे मानधन देखील देणार असल्याचे सांगितले”, असे त्या तरुणीने सांगितले.

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

”ठरलेल्या दिवशी तो मला मालाड स्टेशनला भेटला व तिथून मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यात घेऊन गेला. तिथे मला सांगण्यात आले की या चित्रपटाची गेहना वशिष्ठ निर्माती आहे. गेहनाने मला कपडे दिले घालायला व मला माझा रोल समजवला. त्यानंतर तिने मला दुसरे कपडे आणून दिले. ते बघून मी पुढे काम करायला नकार दिला. तर गेहनाने मला धमकावले की जर मी शूटींग अर्धवट सोडली तर मला दहा लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील. ते ऐकून मी हादरलेच. त्यानंतर आकाश नावाचा एक तरुण माझ्याकडे आला. त्याच्यासोबत गेहनाने मला सेक्स करायला सांगितला. आमच्यातील शरीर संबंध देखील गेहना शूट करत होती. ते झाल्यावर मी तिथून जायला निघाले तेव्हा गेहनाने मला या शूटींगविषयी कुणाला सांगितलेस तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली’ असे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.