
करण जोहरच्या आगामी गुंजन सक्सेना – कारगिल गर्ल या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. जान्हवी कपूर या चित्रपटात गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत असून हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात गुंजन यांच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी झळकणार आहे. या खेरीज अंगद बेदी, विनित कुमार आणि मानव वीज यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Presented by Zee Studios & Dharma Productions, Gunjan Saxena – #TheKargilGirl to release on 13th March, 2020. pic.twitter.com/gf0IWH3U2Y
— Komal Nahta (@KomalNahta) August 29, 2019
With unabashed courage & bravery, she made her domain in a man’s world.
Gunjan Saxena – #TheKargilGirl, releasing on 13th March, 2020. @apoorvamehta18 @shariqpatel #Janhvi @TripathiiPankaj @Imangadbedi @ItsVineetSingh #ManavVij @sharansharma @DharmaMovies @ZeeStudios_ pic.twitter.com/UJCNnl7D6a— Karan Johar (@karanjohar) August 29, 2019
कोण आहेत गुंजन सक्सेना?
गुंजन सक्सेना या हिंदुस्थानच्या वायुदलात फ्लाईट लेफ्टनंट पदावर कार्यरत होत्या. कारगिल गर्ल अशी ओळख असणाऱ्या गुंजन 1996च्या कारगिल युद्धादरम्यान चीता हेलिकॉप्टरच्या साहाय्याने युद्धातील जखमी जवानांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य करत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून डागलेल्या मिसाईलच्या कचाट्यात त्यांचं हेलिकॉप्टरही सापडलं. पण त्या थोडक्यात बचावल्या. या हल्ल्यानेही न डगमगता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्यांच्या या अतुलनीय साहसासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.


























































