
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील अनेक भागात विज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड, गोरेगाव, ठाणे, चेंबूर, खारघर या शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ट्वीटरवर यासंदर्भात Power Cut नावाचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. तसेच लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाल्याची माहिती मिळते आहे.
टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून थोड्याच वेळात विज पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जात आहे. तसेच गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असे देखील कळवण्यात आले आहे.
Mumbai Suburban train services disrupted due to grid failure: Central Railways Chief Public Relation Officers (CPRO) #Maharashtra https://t.co/FxU4upma08
— ANI (@ANI) October 12, 2020



























































