प्रभासच्या आदिपुरुषमध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची वर्णी? चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता प्रभास याच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचं बोललं जात आहे. नायक आणि खलनायक या मुख्य भूमिकांनंतर आता नायिकेची भूमिका कोण करणार, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

आदिपुरुष या चित्रपटात प्रभास नायकाच्या भूमिकेत दिसणार असून लंकेश ही खलनायकी भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे. त्यामुळे आता नायिकेच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी अनेक ठोकताळे मांडले जात आहेत. अनेक अभिनेत्रींची नावं सध्या चर्चेत असून त्यात कियारा आडवाणी हे नाव आघाडीवर झळकत असल्याचं सांगण्यात येत होतं. पण, आता त्यात अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीची भर पडली आहे.

Urvashi Rautela

या अभिनेत्रीचं नाव उर्वशी रौतेला आहे. उर्वशी नुकतीच तिच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाच्या चित्रीकरणातून मोकळी झाली आहे. त्यानंतर दिग्दर्शक ओम राऊत यांनी आदिपुरुष या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी तिला विचारणा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कियारा आडवाणी आणि उर्वशी रौतेला यांच्यापैकी नक्की कुणाची निवड या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टसाठी होतेय, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदिपुरुष हा चित्रपट 3डी असून तो हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.  2022 साली हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितलं जात आहे.