आर्थिक अफरातफर प्रकरण; जबाबासाठी दुसरी तारीख द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी नागरी उड्डाण मंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते प्रफ्फुल पटेल यांनी आर्थिक अफरातफर प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी दुसरी तारीख देण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयाला(ईडी) केली. पटेल यांना गुरुवारी जबाब नोंदवण्यासाठी ईडीपुढे हजर राहायचे होते, मात्र तत्पूर्वीच त्यांनी ही विनंती केली.

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे एअर इंडियाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीसंबंधी पटेल यांचा ईडीमार्फत जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. घोटाळ्यातील आरोपी दीपक तलवारला ओळखत असल्याच्या कारणावरून तपास यंत्रणेने अलीकडेच दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पटेल यांचे नाव नोंदवले आहे.