प्रगती होलिस्टिक डेव्हलपमेन्ट ट्रस्टतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रगती होलिस्टिक डेव्हलपमेन्ट ट्रस्टतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपप्रगती होलिस्टिक डेव्हलपमेन्ट ट्रस्ट आणि केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड यांच्या सहयोगाने धारावी आणि मुंबईतील इतर वस्त्यांमध्ये राहणाऱ्या 1 हजार मजुरांच्या कुटुंबीयांसाठी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आयोजित करण्यात आले आहे.

या प्रकल्पाद्वारे कोरोना व्हायरस रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या, रोजंदारी मजूर आणि गरजूंसाठी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतके जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्याचे योजले आहे. वाटप करण्यात येणाऱ्या प्रत्येक किटमध्ये रोजच्या वापरातील धान्ये आणि इतर आवश्य सामग्रीचा समावेश करण्यात आला आहे. याचा उद्देश मुख्यत्वे करून लोकांनी आपली घरे सोडून गावी निघून जाऊ नये, तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, हा आहे. हा काळ खूप कठीण असून समाजातील दुर्बल घटकांसाठी मदत करण्याची नैतिक जबाबदारी आपलीच असल्याचं मत प्रगती ट्रस्ट आणि केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडतर्फे व्यक्त करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या