
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि जनता दल सेक्युलरचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. निर्णय देताच रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागला. न्यायालयाकडून उद्या शिक्षा जाहीर केली जाणार आहे.
सेक्स टेप प्रकरणात रेवण्णावर खटला चालवण्यात आला. त्याच्यावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच अनेक महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. या आरोपांमुळे रेवण्णाला पक्षातून निलंबित केले होते. रेवण्णाच्या घरात काम करणाऱया एका महिलेने त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तसेच बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्हदेखील सापडल्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडीओत महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांकडून प्रचार
लोकसभा निवडणूक सुरू असतानाच 2024 मध्ये रेवण्णाच्या व्हायरल व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्वल रेवण्णा याच्यासाठी प्रचारही केला होता. त्याचा निवडणुकीत पराभव झाला. मे 2024 मध्ये या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता 14 महिन्यांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.