भूमिका जाहीर केल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नाही – प्रकाश आंबेडकर

50

सामना प्रतिनिधी, बीड

भाजप – आरएसएसला चळवळीचा नसून केवळ हिंदू – मुस्लिम दंगलीचा इतिहास असल्याचा आरोप त्यांनी केला. आरएसएसबाबत काँग्रेस गप्प आहे. त्यांनी भूमिका जाहीर करेपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नाही असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा शनिवारी बीडमध्ये झाली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, देशात विकास, हाताला काम देण अपेक्षित असताना दहा टक्के आरक्षण देवून हे सरकार फसवे असल्याच पुन्हा सिद्ध केलं आहे. नोटाबंदीतून कमावलेल्या पैशातून भाजप निवडणुकांत पाच हजार रुपयांना मत घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

बीडच नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असल्यामुळेच येथील चार कारखाने बंद आहेत. राज्यात दुष्काळ आहे, पण चारा – पाण्याचे नियोजन नाही. सरकारमध्ये दानत नसल्याचे सांगत गोदामांत लाखो टन धान्य सडत असताना जनावरांनाही खायला दिले जात नाही. महाराष्ट्रातील १६९ कुटूंबाभोवती फिरणारी सत्ता वंचितांपर्यंत पोचविण्यासाठी आघाडी केली आहे, असेही ते म्हणाले .

देशात गरजेपेक्षा २० टक्के साखर अधिक उत्पादीत होत असताना मोदी सरकारने पाकिस्तानातून २० लाख टन साखर आयात केली. त्यामुळे ऊस उत्पादक आणि कारखानदार अडचणीत आले. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चौकशा मागे लागतील म्हणून कोणी मोदींना विचारत नाही असेही आंबेडकर म्हणाले. नव्वद दिवसांनी लोकसभेची निवडणूक आहे. आम्ही लोकसभेपूर्वी – विधानसभा उमेदवार आज जाहिर करू इच्छत होतो. मात्र, आता उमेदवारी जाहीर झाली तर मारुन टाकण्याची भिती असल्याचे अनेकांनी सांगीतल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या