प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही; फुप्फुसातील संसर्गामुळे तब्येत आणखी खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत कसलीही सुधारणा होताना दिसत नाही, असे दिल्लीतील आर्मी रिसर्च ऍण्ड रेफरल हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी शुक्रवारच्या मेडिकल बुलेटीनद्वारे स्पष्ट केले. फुप्फुसातील संसर्गामुळे त्यांची तब्येत आणखी खालावत चालल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला आर्मी रिसर्च ऍण्ड रेफरल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूतील गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याचदरम्यान त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच फुप्फुसात संसर्ग झाल्याने सध्या त्यासंबंधी अधिक उपचार केले जात आहेत.