
>> प्रसाद ताम्हणकर
हिंदुस्थान आणि मालदीव यांच्यातला वाद काही मिटता मिटायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या नयनरम्य निसर्गाचे काही सुंदर फोटो शेअर केले आणि त्या फोटोंवर मालदीवच्या एका मंत्र्याने असभ्य भाषेत टिपणी केली आणि या वादाला तोंड फुटले. हिंदुस्थानविरोधी करण्यात आलेल्या एका टिपणीमध्ये मोदींना ‘इस्रायलच्या हातातले बाहुले’ असे संबोधण्यात आले आणि सगळ्यांचे लक्ष या शब्दांनी वेधून घेतले. या सगळ्याचा इस्रायलशी संबंध काय? या प्रश्नात अनेक सामान्य लोक पडलेले असताना खुद्द हिंदुस्थानमधील इस्रायलच्या दूतावासाने त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ‘ट्विटर’) हँडलवरून लक्षद्वीपची सुंदर छायाचित्रे तयार केली आणि इस्रायल लक्षद्वीपमध्ये डिसॅलिनेशन प्रकल्पावर काम करण्यास उत्सुक असल्याचेदेखील सांगितले.
इस्रायलच्या या ट्विटनंतर लक्षद्वीपमध्ये होणारा डिसॅलिनेशन प्रकल्प नक्की आहे तरी काय याची उत्सुकता अनेक लोकांना लागून राहिली आहे. खरे तर मालदीवच काय तर, इतरही अनेक निसर्गरम्य बेटांच्या तोडीस तोड असे लक्षद्वीपचे सौंदर्य आहे. मात्र प्रवासाची अपुरी साधने आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. अशा वेळी आता सरकारने लक्षद्वीपमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभारण्याचा घाट घातला आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डिसॅलिनेशन होय. साध्या भाषेत सांगायचे तर समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून मीठ आणि इतर खनिज पदार्थ वेगळे करणे आणि ते पाणी पिण्यासाठी व इतर वापरासाठी उपयुक्त बनवण्याची प्रािढया म्हणजे डिसॅलिनेशन होय.
समुद्राच्या पाण्याचा पिण्यासाठी थेट वापर केला जाऊ शकत नाही. कारण त्यात 35 हजार पीपीएम (पार्टस् पर मिलियन) इतकी मिठाची घनता असते.
डिसॅलिनेशन प्रािढयेद्वारे ती 10 पीपीएमपर्यंत खाली आणता येऊ शकते आणि असे बनलेले पाणी हे पिण्यासाठी सुरक्षित मानले जाते. लक्षद्वीपसारख्या बेटांच्या समूहात पिण्याच्या गोडय़ा पाण्याची मोठी समस्या आहे आणि अशा वेळी डिसॅलिनेशन तंत्रात जगात सर्वात प्रगत मानले जाणारे इस्रायल, हिंदुस्थानच्या मदतीला येऊ शकते. इस्रायल गेल्या पाच दशकांपासून
डिसॅलिनेशन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर त्यांच्या देशात करत आहे.
2019 पर्यंत इस्रायलने आपल्या पाण्याची 70 टक्के गरज या डिसॅलिनेशन प्रािढयेद्वारे पूर्ण केली होती. याशिवाय 25 टक्के पिण्याचे पाणीदेखील या प्रािढयेतून मिळवले होते. डिसॅलिनेशनव्यतिरिक्त, इस्रायलने सांडपाणी शुद्धीकरणातही यश मिळवले आहे. त्याचा सांडपाणी पुनर्वापराचा दर 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. या पाण्याचा वापर तो शेती आणि इतर दैनंदिन गरजांसाठी करतो. हे सगळे बघता इस्रायल लक्षद्वीपमध्ये किती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो हे लक्षात आल्याने मालदीवमधील काही लोकांचा जळफळाट चालू झाला आहे.
प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये काही ना काही कमतरता असतात. तसेच काही डिसॅलिनेशन प्रािढयेमध्येदेखील आहे. काही फायदे आहेत तसे काही तोटेदेखील आहेत. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार, जगभरात दररोज 100 अब्ज लिटर पाणी डिसॅलिनेशन प्रािढयेद्वारे तयार केले जाते, परंतु या प्रािढयेनंतर तेवढय़ाच प्रमाणात खारट पाणीदेखील मागे उरते. हे पाणी पुन्हा समुद्रात सोडल्यास इको सिस्टिमवर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे आता यामागे उरलेल्या खारट पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. डिसॅलिनेशन प्रकल्प उभारण्यासाठी प्रचंड मोठा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर विजेची गरज भासते. आत इस्रायल आपल्या विजेच्या 10 टक्के वीज फक्त या प्रकल्पासाठी वापरतो आहे. अशा वेळी सौर ऊर्जा हा यावर उपाय असू शकतो का, यादृष्टीने शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
डिसॅलिनेशन प्रािढयेतून मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील काही चिंता आहेत. युनेस्कोच्या मते, या प्रािढयेतून मिळणाऱ्या पाण्यात
मॅग्नेशियमची कमतरता असते, जी आपल्या रोजच्या आहारासाठी खूप महत्त्वाची असते. युनेस्कोचे म्हणणे आहे की, या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे या प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी अनेक लहानमोठय़ा समस्यांचे उत्तर शोधावे लागणार आहे हे नक्की.




























































