प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी सुरूच; काँग्रेस प्रवेशाची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-kishore

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर राजकीय पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर तर्कवितका&ंना ऊत आला आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्या बैठकीत प्रियंका गांधी आणि पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरिष रावत उपस्थित होते. पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्यात सुरु असलेल्या मतभेदाची बैठकीत चर्चा झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. या बैठकीला सोनिया गांधीही हजर होत्या व ही बैठक पंजाबचा वाद किंवा उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या पुढील वर्षी होणाऱया निवडणुकांबाबत नव्हती, तर बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.