माजी क्रिकेटपटूवर दारु पिऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल

822

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याने एका व्यक्तीला व त्याच्या मुलाला मारहाण केल्याची तक्रार मेरठमधील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रवीण कुमार याने दारूच्या नशेत मारहाण केल्याचे तक्रारदाराचा आरोप आहे.

मेरठमधील मुल्तान नगरचे रहिवासी असलेले दीपक शर्मा यांच्यासोबत प्रवीण कुमारचा वाद झाला होता. दीपक शर्मा हे शनिवारी सायंकाळी त्यांच्या मुलाच्या स्कूल बसची वाट पाहत मुल्तान नगरच्या नाक्यावर उभे होते. शाळेची बस आल्याने ते मुलाला घ्यायला पुढे गेले. त्यावेळी प्रवीण कुमारची गाडी बसच्या मागे होती. बस थांबल्यामुळे प्रवीण सतत हॉर्न वाजवत होता. बस मधील केअर टेकअर दीपक यांना काहीतरी माहिती देत होता. त्यामुळे बस जाण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे प्रवीणने गाडी बाहेर येऊन दीपक यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावरून त्यांचा वाद सुरू झाला. त्यानंतर प्रवीणने दीपकला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मध्ये आलेल्या दीपकच्या मुलाला देखील त्याने ढकलले. याप्रकरणी दीपकने पोलिसात तक्रार दाखल केली असून प्रवीण हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या