बस झालं, आता जीवन संपवावं; संघात जागा न मिळाल्याने प्रसिद्ध क्रिकेटपटू नैराश्यात

29469

टीम इंडियात संधी मिळाली की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी क्रिकेटपटू जीवाचं रान करत असतात. पण जर टीम इंडियात पुन्हा वर्णी लागली नाही की ते खेळाडूच्या जिव्हारी लागतं. असाच प्रकार हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याच्यासोबत घडला. प्रवीणला संघात स्थान न मिळाल्याने तो नैराश्यात गेला होता. त्याने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

praveen-kumar-19-jan

प्रवीण कुमारने 8 वर्षांपूर्वी टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला तसेच त्याचा आयपीएलसोबतचा करारही संपला. त्यानंतर 2018 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. संघात पुन्हा स्थान मिळाल्याने तो नैराश्यात गेला होता. याबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले आहे. ‘मी खूप चांगला खेळत होतो. इंग्लंडमध्ये मी चांगली गोलंदाजी केल्याने सर्व माझे कौतुक करत होतो. आता मला कसोटीमध्येही संधी मिळेल असे मला वाटत असतानाच एकाएकी सगळं नाहीसं झालं. या धक्क्यामुळे मी नैराश्यात गेलो’, असे प्रवीण कुमारने सांगितले.

‘एका रात्री मी उठलो. बंदूक घेतली व घराबाहेर पडलो. त्यावेळी मी स्वत:लाच म्हणालो की काय आहे हे सर्व? बस झालं आता, संपवून टाकूया सर्व’. मी गाडी घेऊन हरिद्वार महामार्गावर गेलो. आत्महत्या करण्याचा निश्चय झाला होता. मात्र त्याच वेळी मला गाडीत असलेला माझ्या मुलांचा फोटो दिसला. तो बघून मी हादरलोच. त्यावेळी मला जाणवले की माझ्या या चिमुकल्यांचा यात काय दोष आहे. मी त्यांच्यासोबत असं नाही करू शकतं. या नरकात मी त्यांना नाही ढकलू शकतं. या विचाराने मी माघारी आलो’ असे प्रवीण कुमारने सांगितले.

प्रवीणच्या आयुष्यातील या घटनेने त्याच्यात बदल घडवला. त्यानंतर त्याने नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली. ‘आपल्या देशात मानसिक आजाराबाबत फार माहित नाही. मेरठमध्ये तर कुणालाच मानसिक आजार काय असतात हे माहित नाही. त्यामुळे मी कुणाशी बोलणार होतो. खूप चिडचिड व्हायची. पण आता या थेरपीमुळे व कुटुंबाच्या मदतीमुळे मी नैराश्यातून बाहेर आलो आहे’, असे प्रवीणने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या