
महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. यासबोत लक्ष्मी त्रिपाठी यांचेही आचार्य महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आले आहे. किन्नर आखाड्याची फेररचना करण्यात येणार आहे.
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवण्यास तीव्र विरोध झाला आणि किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला. ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंतर अनेक संतांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे होते की, अशा प्रतिष्ठीत पदासाठी वर्षानुवर्षाची अध्यात्मिक शिस्त आणि समर्पण आवश्यक आहे. मग ममताला एका दिवसात महामंडलेश्वर म्हणून कसे निवडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
योगगुरू बाबा रामदेव यांनीही ममताची महामंडलेश्वर पदावर निवड केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. जे लोक कालपर्यंत संसारिक सुखांमध्ये गुंतलेले होते, ते अचानक एकाच दिवसात संत झाले आहेत किंवा महामंडलेश्वर सारख्या पदव्या मिळवत आहेत, असे रामदेव बाबांनी म्हणाले होते.



























































