कोपरगावात सोमवारी बरसल्या पूर्वमौसमी पावसाच्या सरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहर आणि तालुक्यातील काही भागात सोमवारी दुपारी पूर्वमौसमी पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. अवघ्या वीस एक मिनिटात काही मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्याच्या विविध भागात पावसाळी वातावरण आहे. गेल्या आठवड्यातही तौकते चक्रीवादळामुळे दोन तीन दिवस ढगाळ वातावरण होते व पावसाच्या सरी कोसळल्या. सोमवारी कोपरगाव शहर आणि परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण व उन्हाचा लपंडाव सुरू होता. मात्र, दुपारी साडेचारनंतर आकाश ढगाळ झाले. साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वादळ वारा व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे झालेल्या या पावसाने घराबाहेर आवश्यक कामांसाठी गेलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे काही वेळातच रस्त्यांवर पाणी जमा झाले.