
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीची कोंडी होऊ नये, अथवा वाहतुकीचे नियम वाहन चालकांनी पाळावे, या अनुषंगाने देवगड शहरात सोमवारी नाक्यांनाक्यावर वहातुक पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यात 35 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 22 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात वाहनांची कागदपत्रे नसणे, इशारा करूनही न थांबणे, ट्रिपल सीट अशी एकूण 35 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत देवगड मांजरेकर नाका,कॉलेज रोड ,जामसंडे, खाक्षी तिठा या ठिकाणी वहातुक पोलीसानी विशेष मोहीम राबवली विशेषतः वाहन परवाना तपासणी, विना परवाना वाहन चालविणे, धूम स्टाईलने वाहन चालविणे, ट्रिपल सीट अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत होती. ही मोहिम वाहतूक पोलीस फकरूद्दीन आगा, विशाल वैजल,यांचे समवेत,पोलीस नाईक आशिष कदम,पोलीस कॉन्टेबल गणेश चव्हाण यांनी राबविली.




























































