आठवड्यात पाच लाख विद्यार्थ्यांची हजेरी, पटसंख्येत लक्षणीय वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नववी, दहावी व बारावीच्या वर्गांतील विद्यार्थी संख्येत आता लक्षणीय वाढ होत आहे. 2 डिसेंबरपर्यंत राज्यभरातील शाळांमधील पटसंख्या 4 लाख 91 हजार 962वर पोहोचली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी

2 लाख 99 हजार विद्यार्थी उपस्थित होते. आठवडाभरातच विद्यार्थी संख्येत 1 लाख 92 हजार 769ने वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरपर्यंत राज्यभरातील 11 हजार 322 शाळा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या शाळांची संख्यादेखील वाढली आहे.

23 नोव्हेंबरला 9 हजार 127 शाळा उघडल्या होत्या.

n सोलापूर जिह्यातील शाळांमध्ये सर्वाधिक 50.9 टक्के म्हणजेच 1 लाख 28 हजार 340 विद्यार्थी उपस्थित होते.
n पुणे जिह्यात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण सर्वात कमी केवळ 1.9 टक्के इतकेच होते. विद्यार्थी संख्या 23 हजार 414 इतकी होती.

1 लाख 51 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी

आतापर्यंत नववी, दहावी आणि बारावीच्या एकूण 2 लाख 27 हजार 775 शिक्षकांपैकी 1 लाख 51 हजार 539 शिक्षकांची कोरोना चाचणी पार पडली असून त्यांपैकी 2 हजार 212 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर 92 हजार 343 शिक्षकेतर कर्मचाऱयांपैकी 56 हजार 34 कर्मचाऱयांची कोरोना चाचणी झाली त्यांपैकी 682 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

सर्वाधिक पटसंख्येचे
जिल्हे (टक्केवारी)
सोलापूर 50.9
धाराशीव 26.9
सिंधुदुर्ग 23.4
सातारा 21.6
लातूर 19.6
सांगली 18.5
शाळांची टक्केवारी
गडचिरोली 98.3
नांदेड 96.7
सोलापूर 95.9
धाराशीव 94.7
भंडारा 92.1
लातूर 91.6
वाशीम 91.5
सातारा 90.4