
नामिबियातील आठ चित्ते आज पहाटे विशेष विमानातून मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरच्या विमानतळावर पोहोचले. त्यानंतर हे चित्ते लष्कराच्या तीन हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्क येथे नेण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लीव्हर खेचून चित्ते उद्यानात सोडले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पह्टाग्राफी केली.
हिंदुस्थानातून चित्ता नामशेष होऊन सत्तर वर्षे झाली आहेत. आफ्रिकन देश नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन चित्ते सोडण्यात आले. उर्वरित पाच चित्ते प्रशासन सोडणार आहे. काही दिवस हे चित्ते विशेष बंदोबस्तात राहणार असून, वातावरणाची सवय झाल्यानंतर जंगलात सोडण्यात येतील. चित्ता सोडल्यानंतर पंतप्रधान मोदी पह्टोग्राफी करताना दिसले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान होते.
जनतेला काही महिने प्रतीक्षा करावी लागेल
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून चित्त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. सध्या हे चित्ते पाहुणे आहेत. त्यांना येथील परिसराची माहिती नाही. त्यासाठी काहीकाळ जावा लागेल. कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडलेले चित्ते पाहण्यासाठी नागरिकांना काही महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.




























































