
इंग्रजी ही केवळ संवादाची भाषा असून बौद्धिक असल्याचे प्रमाण नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यामुळे इंग्रजीत कमकुवत असलेले मागे राहणार नाहीत, याची काळजी घ्या असे आवाहनही मोदी यांनी केले. गुजरात गांधीनगरमधील अडालज शहरात सरकारच्या मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स उपक्रमात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ज्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, मात्र इंग्रजीत कमकुवत आहेत ते मागे राहणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. इंग्रजी भाषेतील कमकुवतपणा खेडय़ातील अनेक प्रतिभावान तरुणांसाठी अडथळा ठरत असल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.




























































