पृथ्वी शॉ बनला ब्रॅण्ड ऍम्बेसेडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या हिंदुस्थानात फॅण्टसी स्पोर्टस् पाय रोवू पाहत आहे. देशातील युवकांची पावलेही अशा फॅण्टसी स्पोर्टस्कडे आवर्षित होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘स्पोर्टझ्एक्स्चेंज’ या हिंदुस्थानातील फॅण्टसी स्पोर्टस् क्षेत्रात वेगाने वाढणाऱया ऑडिशनने आपला प्रचार व प्रसार करण्यासाठी हिंदुस्थानचा स्टार युवा फलंदाज पृथ्वी शॉ याची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

‘स्पोर्टझ्एक्स्चेंज’च्या वतीने आगामी आयपीएलदरम्यान आपल्या ब्रॅण्डची व्याप्ती वाढवण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. ‘यहा है पुछ एक्स्ट्रा’ ही या कॅम्पेनची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. यासाठी पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी ‘स्पोर्टझ्एक्स्चेंज’चे सीईओ व संस्थापक हरी नारायण म्हणाले, पृथ्वी शॉ याने कठीण परिस्थितीत दमदार कामगिरी करीत आपली चुणूक दाखवली आहे. त्याची अफाट ऊर्जा व प्रचंड क्षमता यावर आमचा विश्वास आहे. या रोमांचक प्रवासामध्ये आम्ही पृथ्वी शॉचे स्वागत करीत आहोत.

फॅण्टसी स्पोर्टस्शी जोडल्याचा आनंद

पृथ्वी शॉ यावेळी म्हणाला की, ‘स्पोर्टझ्एक्स्चेंज’च्या माध्यमातून क्रिकेटच्या फॅण्टसी स्पोर्टस् घटकाशी संलग्न झाल्याचा मला आनंद होत आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक एक्स्ट्रा फिचर आहेत. त्यामुळे हा गेम अधिक रोचक झाला आहे. ‘स्पोर्टझ्एक्स्चेंज’सोबतच्या प्रवासासाठी मी उत्सुक आहे, असेही तो आवर्जून सांगतो.