
कोरोना काळात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. लोकांना केंद्रभागी ठेवून लोकाभिमुख सरकार देता येते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दिखावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.
यावेळी स्वबळाच्या नाऱयावर चव्हाण म्हणाले, काँग्रेसची 1999 पासूनची निवडणुकांची परंपरा सुरू आहे. त्यामध्ये काहीही फरक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा अपवाद सोडला तर स्वबळावर लढल्या आहेत. मात्र, विधानसभा, लोकसभांची रणनीती ही पेंद्रातून ठरते. अंतिम निर्णय श्रेष्ठाr घेतात. प्रदेशाध्यक्ष पटोले कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत
कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा, आधीच्या काळात असं होत नव्हतं. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली. ते भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं? अशी टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली.






























































