अस्थमा फक्त दिवाळीत होतो काय, सिगारेट पिणाऱ्या प्रियंकाला नेटकऱ्यांनी फटकारले

70

सामना ऑनलाईन । मुंबई

काही वर्षांपूर्वी प्रियंका चोप्रा हिने दिवाळीत फटाक्यांमुळे पर्यावरणाची हानी होते व तिच्यासारख्या अस्थमा असलेल्या रुग्णांना त्रास होतो असे सांगणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर अनेकांनी प्रियंकाच्या अस्थमाच्या आजारावरून तिच्याबाबत सहानभूती व्यक्त केली होती. मात्र आता प्रियंकाचा सिगारेट पीत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देसी गर्लचा हा विदेशी अवतार पाहून नेटकरी भडकले असून अस्थमा फक्त दिवाळीतच होतो का? असा सवाल केला आहे.

18 जुलैला प्रियंकाचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने तिची आई मधू चोप्रा व बहिण परिणीती चोप्रा या अमेरिकेला गेल्या आहेत. वाढदिवसानंतर दोन दिवसांनी प्रियंका कुटुंबासोबत मिआमी येथे फिरायला गेली होती. त्यावेली बोटीवर बसून प्रियंका, निक व मधू चोप्रा हे सिगारेट ओढत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अस्थमा असलेली व्यक्ती सिगारेट कशी ओढू शकते, अस्थमा फक्त दिवाळीतच होतो का, तु अशी दुटप्पी आणि खोटं कशी वागू शकते असे सवाल नेटकऱ्यांनी प्रियंकाला केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या