‘सिंदूर’चे श्रेय घेता, मग पहलगामची जबाबदारी घ्या; प्रियंका गांधी यांचे सडेतोड प्रत्युत्तर

‘सिंदूर’चे श्रेय घेता, मग पहलगामची जबाबदारीही घ्या, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी अमित शहा आणि सत्ताधाऱयांना खडेबोल सुनावले. गेली 11 वर्षे देशावर भाजपची सत्ता आहे. किमान आतातरी नेहरू-गांधींना दोष देण्याऐवजी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका, अशा सडेतोड भाषेत प्रियंका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

अनेकांनी ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाचे धडे दिले. पण, हा हल्ला कसा झाला? का झाला? याचे उत्तर कोण देणार असा सवाल करत प्रियंका गांधी यांनी सरकारच्या धोरणांची चिरफाड केली.

तुमच्या नाकाखाली मणिपूर जळत होते

मणिपूर पेटले, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम हल्ला झाला आणि अमित शहा अजूनही गृहमंत्रिपदावर आहेत? तर पंतप्रधान ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेतात, पण केवळ श्रेय घेण्याने नेतृत्व निर्माण होत नाही, असा हल्ला प्रियंका गांधी यांनी केला.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?

पाकिस्तानात बसून हल्ल्याचा कट रचला गेला, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही का? त्यांनी याची जबाबदारी घेतली का? गुप्तचर यंत्रणा गृहमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. मग त्यांनी राजीनामा दिला का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी अमित शहा यांना केला. मुंबईवर 2008 ला दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यातील दहशतवाद्यांना तिथेच पंठस्नान घातले. पकडलेल्या एकाला 2012 मध्ये फासावर लटकवले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. देशाच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेत राजीनामा दिला. आम्ही जबाबदारी घेतली, देशाच्या जनतेसाठी, मातीसाठी, याची त्यांनी सत्ताधाऱयांना आठवण करून दिली

शिवसेना शाखा क्र. 169 च्या वतीने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. उपविभागप्रमुख राजेंद्र साटम, उपविधानसभा संघटक सचिन उमरोटकर, शाखाप्रमुख राकेश पुगावकर, शाखा संघटक मिताली साटम, युवासेना मुंबई समन्वयक साईली लाड यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमाला पुर्ला विधानसभाप्रमुख मनीष मोरजकर, विधानसभा संघटक बोराडे, दिशा लाड, केतन हिर्डेकर, गोडसे, सीताराम माने, अफरोज खान, इस्माईल शेख, गजानन शिवलकर, दशरथ गायकवाड, किशोर नाईक, सिद्धार्थ कारंडे, रेखा कांबळे, आम्रपाली बारशिंगे, गणेश नारायण, मनीषा भाटकर, सुवर्णा पुठवळ उपस्थित होते.