Iran Isreal Us War रशियातील चेचेन सैन्य अमेरिकेविरोधात युद्धात उतरणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण -इस्रायल अमेरिकेच्या युद्धात आता अप्रत्यक्षपणे रशियाने देखील उडी घेतली आहे. अमेरिकेने जर इराणविरोधात जमिनीवर युद्ध केलं तर रशियातील चेचेन सैन्य हे इराणच्या समर्थनार्थ या युद्धात उतरणार आहेत.

रशियाच्या चेचन्या प्रांताचे प्रमुख रमझान कादिरोव्ह यांच्या नेतृत्वाखालील लष्करी तुकड्यांनी इराणला पाठिंबा दर्शवत थेट युद्धभूमीवर उतरण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकन सैन्याच्या संभाव्य आक्रमणाविरोधात इराणच्या सशस्त्र दलांना मदत करण्यासाठी चेचेन सैन्य सज्ज असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

चेचेन सैन्याचे प्रमुख कादिरोव्ह यांनी या युद्धाला ‘धर्मयुद्ध’ म्हटले आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या फौजांविरुद्धचा हा लढा ‘चांगले विरुद्ध वाईट’ अशा स्वरूपाचा असल्याचे कादिरोव्ह यांनी म्हटले आहे. “इस्लामिक प्रजासत्ताक असलेल्या इराणचे रक्षण करणे आणि पाश्चात्य आक्रमण रोखणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशी भूमिका चेचेन सैन्याने घेतली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिका इराणच्या खर्ग प्रात ताब्यात घेण्यासाठी जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. इराणचा खर्ग प्रांत हा सर्वाधिक तेलसाठा असलेला इराणचा एक महत्त्वाचा भाग आहे.