
टय़ूब, फेसबुकवर व्हिडीओ पाहताना अनेकदा बफरिंगची समस्या उद्भवते. नेटवर्क अधूनमधून बंद होते. ही समस्या लवकरच दूर होणार आहे. ऑगस्टपर्यंत देशात ‘5 जी’ इंटरनेट सुरू होणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत देशात ‘5 जी’ इंटरनेट सुरू होईल असे पेंद्रीय टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते. ‘5 जी’ स्पेक्ट्रमच्या विक्रीची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. चालू आठवडय़ातच यासंदर्भात डिजिटल संचार समितीची (डीसीसी) बैठक होणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय ही समिती घेते.
साडेसात लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, रकमेला होणार लिलाव
‘5 जी’ स्पेक्ट्रमबाबत ट्रायकडूनही शिफारशी मागवण्यात आल्या आहेत. 1 लाख मेगाहर्टज् स्पेक्ट्रमचा साडेसात लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेला लिलाव करण्याची शिफारस सरकारने केली होती. त्याची मुदत 30 वर्षे असेल. लिलाव पूर्ण झाल्यानंतर तातडीने ‘5 जी’ स्पेक्ट्रम लागू केले जाणार आहे.



























































