दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा प्रस्ताव मंजूर

हिंदुस्थानसाठी 40 हजार कोटी रुपये खर्चून दुसरी विमानवाहू युद्धनौका बांधण्याच्या नौदलाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाच्या डिफेन्स प्रोक्युरमेंट बोर्डाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हिंदुस्थानी महासागरात चीनच्या वाढत्या वावराविषयी चिंता व्यक्त होत असताना हिंदुस्थानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानने आपली सामरीक शक्ती वाढवण्यावर भर दिला असून हिंद महासागरात चीनच्या हेरगिरी करणाऱ्या युद्धनौकांची होणारी घुसखोरी रोखण्यासाठीही मोठय़ा विमानवाहू युद्धनौकांची मदत होणार आहे.