
सामना ऑनलाईन, पंढरपूर
शिवसेनेचे उपनेते आणि आमदार तानाजी सावंत यांना धमकी दिल्याचा निषेध करत पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून जोडे मारो आंदोलन केले. आमदार सावंत यांच्या खाजगी साखर कारखान्याने शासकीय नियमानुसार शेतकऱ्यांना ऊस दर दिला असताना अर्धवट माहितीच्या आधारे राजू शेट्टी यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. पंढरपूरचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख, महावीर देशमुख, शहर प्रमुख संदीप केंदळे, माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके, योगेश चव्हाण, सुधीर अभंगराव, रवी मुळे, सिध्दनाथ कोरे, काकासाहेब बुराडे आदी उपस्थित होते.


























































