
बंगळूरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनाचे पडसाद आज सोलापूरात उमटले असून छत्रपती शिवाजी महारज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. कर्नाटकातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याजवळ कर्नाटकातील भाजप सरकार व मुख्यमंत्री बोम्मई यांच्याविरोधात मानवी साखळी करून घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, नगर शहर शिवसेनेच्या वतीने दिल्लीगेट येथे निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला.































































