
इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) च्या 93 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच एक महिला अधिकारी निवडून गेली आहे. महाराष्ट्राची लेक सई जाधव ही आयएमएमधून पदवी प्राप्त करणारी पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली आहे.
सई जाधव ही मूळची कोल्हापूरची आहे. वडील लष्करात असल्याने तिने देशाच्या विविध भागांत शिक्षण घेतले. पदवी प्राप्त केल्यानंतर तिने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली एसएसबीद्वारे तिची निवड झाल्यानंतर तिने हिंदुस्थानी लष्करी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. सईने अकादमीमध्ये सुमारे सहा महिने कठोर परिश्रम घेऊन लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. 1932मध्ये स्थापन झालेल्या या हिंदुस्थानी लष्करी अकादमीने सुमारे 67,000 अधिकारी कॅडेट्सना प्रशिक्षण देऊन सैन्याला बळकटी दिली आहे. त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला अधिकारी लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात सामील झाली आहे. संपूर्ण देशासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या पासिंग आउट परेडमध्ये प्रथमच महिला ऑफिसर कॅडेट्स परेड करतील आणि ही अकादमीची महिला अधिकाऱ्यांची पहिली बॅच असेल.



























































