
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 13 जून रोजी मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान आणि आरोग्य शिबिरे आणि अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

z शिवसेना-युवासेना मागाठाणे शाखा क्र. 12 वतीने विभागातील सर्व अंगणवाडय़ांमध्ये मुलांना खाऊ वाटप आणि अंगणवाडय़ांना सतरंजी वाटप करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूणकर, रेखा बोऱहाडे, सिमितीनी नारकर, मिलिंद साटम, रोहिणी चोगले, सारिका झोरे, सुप्रिया बोवलेकर, सचिन मोरे, इतिश्री महाडिक, दत्ताराम मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे आणि युवा विभाग अधिकारी वृषल पुसाळकर यांनी केले.

z शिवसेना शाखा क्रमांक 97 आणि सांताक्रुझ पाश्चिम शाखाप्रमुख सुनील मोरे यांच्या वतीने विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सांताक्रुझमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विभागातील मान्यवर डॉ. जोशी आणि इतरांकडून वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या एच-पश्चिम विभागाकडून वृक्ष संजीवनी मोहीम राबवणाऱ्या सेवकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा समन्वयक उषा भोजने, माजी नगरसेवक अशोक पाटील, युवा शाखा अधिकारी समीर चव्हाण यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

z शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी शिवसेना आणि युवासेना चेंबूर विधानसभा प्रभाग क्रमांक 155 मध्ये विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि विभाग अधिकारी दीपेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख अशोक वीर यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शाखाधिकारी निखिल भोईटे यांनी कीटकनाशक धूर फवारणी, स्वच्छता मोहीम, नालेसफाई इत्यादी उपक्रम राबवले.




























































